प्रतिनिधी / सातारा :
महाराष्ट्र रग्बी असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या सब ज्युनिअर 14 वर्षे वयोगटातील आंतरजिल्हा राज्यस्तरीय रग्बी चषक स्पर्धा या चंद्रपूर येथे 26, 27 फेब्रुवारी रोजी पार पडल्या. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांचा सहभाग होता.
स्पर्धेतूनच सातारा जिल्हा संघातून मुलांमध्ये अर्णव किरण पाटेकर आणि मुलींमध्ये प्रेरणा प्रदीप डांगरे व दीपिका रीचपाल रीन्हवा या खेळाडूंची महाराष्ट्र संघात निवड झाली. पुढील सब ज्युनिअर 14 वर्षे वयोगटातील राष्ट्रीय रग्बी स्पर्धा या सिकंदराबाद (हैदराबाद) येथे दि.5 ते 6 मार्च रोजी पार पडलेल्या या स्पर्धेत मुलींच्या महाराष्ट्र संघाने तिसरा क्रमांक पटकावत कांस्य पदक मिळवले.
या खेळाडूंना प्रशिक्षक म्हणून अंकुश जांभळे, अजिंक्य जांभळे, दिपराज राजेभोसले, श्रीधर जाधव, आरती दुदूस्कर, दिव्या पवार यांचे मार्गदर्शन लाभले. सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी युवराज नाईक यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.