ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांसह राज्यातील वीज कर्मचाऱ्यांना ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिलासा दिला आहे. ऐन दिवाळीत वीज कर्मचाऱ्यांनी संप पुकारण्याची घोषणा केल्याने राज्यावर सणासुदीत काळोख होण्याची भीती होती. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी वीज कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर केला आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच हा बोनस दिला जाणार आहे. अशी माहिती स्वतः राऊत यांनी ट्विट करून दिली आहे.
राज्यातील 1 लाख कर्मचाऱ्यांना याचा फायदा मिळणार आहे. ही रक्कम गेल्यावर्षी इतकीच असणार आहे. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 15 हजार तर विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक यांना प्रत्येकी 9 हजार रुपये बोनस मिळाणार आहे.
वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याचा तत्वतः निर्णय मी घेतला असून रकमेची घोषणा आहे. येत्या तीन ते चार दिवसांमध्ये करण्यात येईल. सर्व संघटनांनी आपला संप रद्द करून वीज ग्राहकांना त्रास होईल, असे कृत्य करू नये असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, महावितरणमधील 7500 पदांवरील नियुक्ती पत्र जारी करण्याचे आदेश मी आज ऊर्जा विभागाला दिले आहेत. उपकेंद्र सहाय्यक, पदवीधर आणि पदविकाधारक शिकाऊ अभियंता, ज्युनियर इंजिनिअर, आदी पदांवरील नियुक्तीचे आदेश लगेच जारी होतील, अशी माहितीही राऊत यांनी ट्विट करत दिली आहे.