प्रतिनिधी / बेळगाव
येथील महालक्ष्मी मंदिराचा पंचेचाळीसावा वर्धापन दिन उत्साहात आणि भक्तीपूर्ण वातावरणात शुक्रवारी पार पडला यानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी लक्ष्मीनारायण रुदय पारायण होम श्रीसूक्त होम महालक्ष्मी मूलमंत्र होम तसेच नवग्रह पूजा असे धार्मिक विधी झाले मारुती भट यांनी पौरोहित्य केले त्यांना अक्षय व विनायक भट यांचे सहकार्य लाभले कोबी नियमामुळे यंदा महाप्रसाद रद्द करण्यात आला तरी भाविकांना तीर्थप्रसाद देण्यात आला सायंकाळी कचेरी गल्ली येथील स्वरगंध महिला मंडळाचे भजन झाले तसेच त्यानंतर सुरेश वेर्णेकर यांच्या वतीने भजन झाले मंडळाच्या अध्यक्षा सुमती कुदळे सचिव भारती किल्लेकर उपाध्यक्ष शोभा कंग्राळकर खजिनदार धनश्री सावंत स्मृती कामत पल्लवी कंग्राळकर अश्विनी जांगळे सुरेखा सावंत कमल यादव तसेच जे÷ सदस्य पार्वती भातकांडे यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.