प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळीचे औचित्य साधून महिला आघाडीतर्फे यंदाही घरगुती पातळीवर फराळाचे पदार्थ तयार करुन त्याचा विक्री शुभारंभ करण्यात आला. काकतीवेस रोड येथे मंगळवारपासून हे पदार्थ उपलब्ध आहेत. या उपक्रमाचा शुभारंभ माजी महापौर सरिता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर व अन्य सदस्या उपस्थित होत्या.