वृत्तसंस्था/ माऊंट माँगनुई (न्यूझीलंड)
आयसीसीच्या आगामी महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी लीग टप्प्याकरिता मंगळवारी पंच व सामनाधिकाऱयांची घोषणा करण्यात आली. सदर स्पर्धा 4 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान न्यूझीलंडमध्ये सहा ठिकाणी खेळविली जाणार आहे.
महिलांच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला आयसीसीकडून महिला सामनाधिकाऱयांची नियुक्ती करून आपले सहकार्य देण्याचे अभिवचन यापूर्वी देण्यात आले होते. यजमान न्यूझीलंड आणि विंडीज महिला क्रिकेट संघातील या स्पर्धेत सलामीची लढत बे ओव्हल मैदानावर होणार आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची माजी क्रिकेटपटू शान्ड्रे फ्रिट्ज ही सामनाधिकारी म्हणून राहील. फ्रीजने आपल्या वैयक्तिक क्रिकेट कारकीर्दीत 2005, 2009 आणि 2013 साली झालेल्या महिलांच्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला होता. दक्षिण आफ्रिकेची माजी क्रिकेटपटू लॉरेन ऍगेनबग तसेच शरफुद्दौला इबने शाहीद (मैदानी पंच), ऍलेक्स व्हार्फ, सुझान रेडफर्न हे पंच म्हणून राहतील. या स्पर्धेत जी.एस. लक्ष्मी (सामनाधिकारी), पंच म्हणून किम कॉटन, क्लेअर पोलोसॅक, शेरीडन, जॅक्वेलीन विलीयम्स, ऍड्रीयन ग्रिफिथ यांची या स्पर्धेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
सामनाधिकारी- गॅरी बॅक्स्टर, जी.एस. लक्ष्मी, फ्रिट्ज, पंच- ऍगेनबग, किम कॉटन, अहमद शहा पकतीन, रूचिरा पल्लियागुरुगे, क्लेअर पोलोसॅक, रेडफर्न, रूसेरी, एस. शाहीद, व्हार्फ, विलीयम्स आणि पॉल विल्सन.