जगातील अनोखा समुदाय
जगात अनेक असे समुदाय आहेत, ज्यांच्या परंपरांविषयी जाणून घेतल्यावर प्रत्येक जण दंग होतो. या समुदायांच्या स्वतःच्या वेगवेगळय़ा पद्धती असतात. इंडोनशियात राहणारा एक समुदाय खूपच वेगळा आहे.
जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेला देश इंडोनेशियात वारिआ समुदायाचे वास्तव्य आहे. हा समुदाय स्वतःच्या धर्म आणि तत्वांचे अन्य मुस्लीम समुदायांप्रमाणेच पालन करतो. परंतु या समुदायातील पुरुष महिलेच्या स्वरुपात स्वतःचे आयुष्य जगतात आणि त्यांना वारिआ म्हटले जाते. 2008 मध्ये या समुदायाने स्वतःचा वेगळा मदरसा देखील स्थापन केला होता.
पुरुषांचे महिला म्हणून राहणे अत्यंत हैराण करणारे असले तरीही यामागे विशेष कारण आहे. इंडोनेशियाच्या या समुदायात जे बायोलॉजिकली पुरुष म्हणून जन्माला येतात, त्यांना स्वतःचा आत्मा महिलेचा असल्याचे वाटते, यातूनच पूर्ण जीवन महिलेसारखे जगतात. वारिया हा इंडोनेशियन शब्दांपासून तयार झालेला शब्द आहे. वानिताचा अर्थ महिला आणि प्रिआचा अर्थ पुरुष असा होतो. याचमुळे समुदायात पुरुष हे महिलेचे जीवन जगतात. 2008 मध्ये योग्याकार्ता नावाच्या ठिकाणी वारिआ समुदायाच्या लोकांसाठी एक प्रार्थनास्थळ तयार करण्यात आले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांचे प्रारंभिक जीवन इंडोनेशियात व्यतित झाले होते. तेव्हा त्यांची देखभाल करणारी दाई वारिआच होती.