प्रतिनिधी / सातारा :
जावली तालुक्यातील एका गावातील शेळीफार्मवर कामास असलेल्या परप्रांतीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात एका परप्रांतीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 30 रोजी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान एका गावातील फार्महाऊसवर ही घटना घडली आहे. यातील पीडीत महिला तिथे कामाला असून, तिथेच कामाला असलेल्या अल्पवयीन परप्रांतीय 17 वर्षीय मुलाने तिच्याशी जवळीक साधण्यास सुरूवात केली. तसेच विष देवून मारुन टाकण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. आरोपीने त्याच रात्री पुन्हा महिलेवर अत्याचार केले. याबाबत कोठे वाच्यता केल्यास पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीनंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्या युवकाचा शोध घेत आहेत. या गुन्हयाचा अधिक तपास मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने करत आहेत.