वृत्तसंस्था/ माँट्रियल
कोरोना व्हायरस महामारीमुळे डब्ल्यूटीए टूरवरील येथे 7 ते 16 ऑगस्ट दरम्यान होणाऱया माँट्रियल महिलांच्या टेनिस स्पर्धेवर साशंकेतचे सावट निर्माण झाले आहे.
कोरोना प्रसारामुळे क्युबेक प्रोव्हिन्सच्या अधिकाऱयांनी संपूर्ण परिसर लॉकआऊट करण्याचा निर्णय घेतला असून 31 ऑगस्टपर्यंत या परिसरात होणाऱया सर्व क्रीडास्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यामुळे या स्पर्धेवर साशंकतेचे सावट निर्माण झाले आहे. कॅनडामध्ये कोरोनाचा प्रसार झपाटय़ाने होत असल्याने अनेक शहरे लॉकआऊट करण्यात आली आहेत. आंतरराष्ट्रीय टेनिस फेडरेशनने आपल्या सर्व स्पर्धा 13 जुलैपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.