बेंगळूर/प्रतिनिधी
जनता दल (सेक्युलर) प्रमुख आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी बुधवारी कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दरम्यान कोरोना चाचणी केली असता माजी पंतप्रधान देवेगौडा यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
देवेगौडा यांनी यांची पत्नी सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले आहे. त्यांनी कोरोना चाचणी अहवालानंतर दोघेही कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. तसेच आम्ही कुटुंबातील इतर सदस्यांसह स्वत: ला वेगळं करत आहोत. गेल्या काही दिवसांपासून आमच्याशी संपर्क साधलेल्या सर्वांना स्वतःची चाचणी घेण्याची विनंती करतो,” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ८७ वर्षीय माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी पक्षाचे कार्यकर्ते आणि हितचिंतकांना घाबरू नका आणि संक्रमण टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी अशी विनंती केली आहे.