चिकोडी येथील भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने कार्यक्रम
प्रतिनिधी/ बेळगाव
भारतरत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त चिकोडी येथील भाजप ओबीसी मोर्चाच्यावतीने कार्यक्रम करण्यात आला. कागवाड येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीला गोमातेचे पूजन करून अटलजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी स्वच्छ अभियानही राबविण्यात आले. कृषीदिन तसेच सुशासन दिवस देखील आचरणात आणण्यात आला. कार्यक्रमाला राज्य ओबीसी मोर्चा कार्यदर्शी किरण जाधव, कागवाड मंडळ अध्यक्ष तम्मण्णा पराशेट्टी, राज्य कापड व अल्पसंख्याक मंत्री श्रीमंत पाटील, चिकोडीचे ओबीसी मोर्चा अध्यक्ष श्रीशैल शैलाप्पगोळ, ओबीसी मोर्चा कागवाड अध्यक्ष बाबू मेडिगिरी, ओबीसी मोर्चा चिकोडी उपाध्यक्ष अनिल नवलगिरी, पीएलडीई बँक चेअरमन शीतल पाटील, कागवाड मंडळ महिला मोर्चा अध्यक्षा श्रीदेवी चौगुला आणि चिकोडी विभाग महिला मोर्चा पदाधिकारी विमल पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते..