आपचे बाणावलीतील विजयी उमेदवार वेंझी व्हिएगस यांचे आश्वासन : प्रत्येक घराला पाणी-वीजजोडणी देणार
प्रतिनिधी /मडगाव
बाणावलीतून निवडून आलेले आपचे उमेदवार वेंझी व्हिएगस यांनी माजी क्रीडामंत्री आणि बाणावलीचे माजी आमदार माँत क्रूझ यांना दिलेल्या वचनानुसार त्यांची नुकतीच भेट घेतली. यावेळी क्रूझ यांचा दृष्टिकोन पुढे नेताना बाण?ावलीमधील प्रत्येक घराला वीज आणि पाण्याची जोडणी मिळणार य?ाची खात्री करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक क्षण आहे. ब?ाणावलीच्या लोकांना शंभर टक्के पाणी आणि वीजजोडणीचे त्यांचे स्वप्न माझ्याकडून पूर्ण होईल असे आश्वासन मी प्रुझ य?ांना देण्यासाठी आलो आहे, असे पत्रकारांशी बोलताना व्हिएगस यांनी सांगितले. निवडणुकीच्या आधी मी त्यांना भेटायला आलो होतो. मतदानापूर्वी त्यांचा आशीर्वाद घेताना मतदारसंघातील प्रत्येक घराला पाणी आणि वीज उपलब्ध करून देऊन आपला दृष्टिकोन पुढे न्यावा अशी विनंती पूझ यांनी केली होती, असे त्यांनी सांगितले.
विक्रमी वेळेत फातोर्डा स्टेडियम बांधून क्रूझ यांनी स्वतःचे नाव इतिहासात नोंदले आहे. योग्य नियोजनाचे प्रतीक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. प्रशासनात हातखंडा तसेच भ्रष्टाचारविरहीत पद्धत या क्रूझ यांच्या जमेच्या बाजू होत्या, असे व्हिएगस यांनी सांगितले. दरम्यान, बाणावली मतदारसंघांतील सात सरपंचांना व्हिएगस यांनी आवाहन केले आहे. बाणावली, कोलवा, सुरावली, वार्का, ओडली, करमणे आणि केळशी या त्यांच्या पंचायत क्षेत्रांतील कोणत्याही घराला पाणी आणि वीजजोडणी कोणत्याही कारणास्तव नसल्यास नजरेस आणून द्यावी. मी ही जबाबदारी घेऊन लोकांना पाणी व वीजजोडणी मिळावी यासाठी आमदार म्हणून प्रयत्न करेन. या समस्येचे निराकरण करून मी क्रूझ यांचे स्वप्न सत्यात उतरवेन, असे ते म्हणाले.