कृषिदिन म्हणून 1 जुलैला साजरी होणार
प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती राज्यात दि. 1 जुलै 2021 रोजी कृषिदिन म्हणून साजरी करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची कामगिरी लक्षात घेवून त्यांची जयंती राज्यात.1 जुलै 2021 रोजी कृषिदिन म्हणून साजरी करण्याच्या शासन निर्णयाव्दारे प्राप्त झालेल्या सुचनांनुसार संपूर्ण जिल्ह्यात हा दिवस साजरा करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम जिल्हा परिषद, पंचायत समिती स्तरावर मोठ्या प्रमाणात करण्याचे नियोजन आहे. कार्यक्रमास तालुका स्तरावरील लोकप्रतिनिधी, प्रगतशिल शेतकरी, शेतकरी मित्र, तालुकास्तरीय इतर अधिकारी, आत्माअंतर्गत स्थापन झालेल्या शेतकरी सल्लागार समितीचे तालुकास्तरीय सदस्य, तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपनी प्रतिनिधी यांना निमंत्रित करण्यात येणार आहे. कार्यक्रमानिमित्त कृषि शास्त्रज्ञ, तालुक्यातील पुरस्कार प्राप्त शेतकरी यांची मार्गदर्शनपर व्याख्याने प्रत्येक तालुक्यात करण्याचे नियोजन केले असल्याचे. मास्तोळी यांनी सांगितले.