मतदारांच्या गाठीभेठी घेण्यास केली सुरवात
मोरजी /प्रतिनिधी
मांदे मतदार संघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याचा आपण निर्णय घेतला असल्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी प्रस्तुत प्रतिनिधी पाशी बोलताना सांगितले. आगरवाडा येथे काही प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेण्यास आले असता त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधीला ही माहिती दिली
ते म्हणाले आपण भाजपचा सच्चा शिलेदार म्हणून पक्षाच्या हितासाठी आजवर पक्षाबरोबर राहिलो मला जरी भाजपने उमेदवारी दिली नसली तरी जनतेचा उमेदवार म्हणून मी जनतेच्या दरबारात जाणार आहे आणि मंदेतील सुज्ञ जनता माझ्या पाठीशी निश्चितच उभी राहील असा माझा ठाम विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या समर्थकांच्या आणि हितचिंतकांच्या आग्रहासाठी मला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे .आज नाही तर कदापि हे शक्मय होणार नाही तसेच आपल्या कारकिर्दीत जे पेडणे तालुक्मयात उर्वरित अर्धवट प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आपण मान्द?वासियांच्या आग्रहासाठी आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी सांगितले..
भाजपाने मागच्या दोन वर्षापासून 2022 ची उमेदवारी आपल्यालाच देणार अशी हमी केंद्रीय नेत्यांनी दिली होती. मात्र 20 रोजी भाजपाच्या संभाव्य उमेदवाराची यादी जाहीर झाली त्यात माझा पत्ता कट केला याचे दुःख आणि सल माझ्या मनात आहेच. मात्र .या प्रकाराने माझ्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे माझ्यासाठी सर्वकाही सोसलेल्या माझ्या समर्थकांसाठी मी हा कठोर निर्णय घेत असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी मुख्यमंत्री पार्सेकर याना उमेदवारी नाकारल्याने त्यांचे शेकडो कार्यकर्त्ये समर्थक संतप्त झाले होते, आता जिंकू किवा मरू या ईराद्याने सर्व समर्थकांनी पार्सेकर यांच्यावर 20 पासून दबाव आणून तुम्ही आता अपक्ष उमेदवारी दाखल करा आम्ही तुम्हाला विजयी करून मतदार संघाचा आमदार बनवतो, असा विश्वासही . कार्यकर्त्यांनी दिला, कार्यकर्त्यांनी 20 रोजी हरमल शिक्षण संकुल सभागृहात बैठक आयोजित केली आणि त्या बैठकीला पार्सेकर याना निमंत्रित करून कार्यकत्यांनी आपल्या भावना आपल्या नेत्यासमोर व्यक्त केल्या, कार्यकर्त्यांच्या भावना आणि हुदयाला भिडणारे शब्द वापरल्याने पार्सेकरही थोडे स्थब्द झाले, शांत पणे त्यांनी कार्यकर्त्याना संबोधताना आपण दोन तीन दिवसात निर्णय घेणार असे जाहीर केल्यानंतर 21 रोजी स्थानिक पत्रकारांनी छेडले असता आता मात्र आपण पक्षाचा राजीनामा देवून अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले.
मान्दत इतिहास बदणार ?
मांदे मतदार संघाचा नवा इतिहास रचण्यासाठी आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे माजी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगिटले
पाच वर्षे द्या, उर्वरित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी….
माजी मुख्यमंत्री लक्ष्मिकान्त पार्सेकर यांनी जनतेला आवाहन करताना आपल्याला केवळ आमदार म्हणून पुढील पाच वर्षे द्या जे पेडणे तालुक्मयात जे आपण प्रकल्प आणले ते अर्धवट स्थितीत आहेत , ते प्रकल्प पूर्ण करायचे आहे, मागच्या पाच वर्षात या प्रकल्पाकडे आमदाराने पहिले नाही, ते आपणाला पूर्ण करायचे आहेत, त्यासाठी आपण सरकारात असायला हवे असे नाही, आमदार आपण झालो कि विधानसभेत आवाज उठवून हे प्रकल्प पूर्ण करून घेईन अशी ग्वाही दिली.
तुये येथील 100 खाटांचे नवीन हॉस्पिटल बांधले.त्या ठिकाणी सर्व सोयी सुविधा पुरवायच्या आहेत, तुये हॉस्पिटलला गोवा मेडिकल हॉस्पिटलशी जोडायचे आहे, शहरात ज्या सोयी सुविधा आहेत त्या ग्रामीण भागात आपल्याला पुरवायच्या आहेत असे पार्सेकर यांनी सांगून तेरेखोल पूल अर्धवट राहिला तो पूर्ण करायचा , बेरोजगारीचा प्रश्न तुये येथील आयटी प्रकल्पात नव नवीन प्रकल्प आणून सोडवला जाईल त्यासाठीच आपल्याला पुढील पाच वर्षासाठी आमदारकी हवी असे माजी मुख्यमंत्री पार्सेकर म्हणाले.
मतदार आणि समर्थकांच्या वाढत्या आग्रहासाठी आणि प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आपण अपक्ष उमेदवारी दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे पार्सेकर म्हणाले.
आपल्याकडे अनेक पक्षाचे युतीचेही उमेदवार येवून सर तुम्ही उमेदवारी दाखल करा आम्ही तुमच्या सोबत आहोत असे सांगून जातात, त्याच बळावर आणि मांदेवासीयांच्या हितासाठी आपण अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरणार असल्याचा पुनरुच्चार केला.
दरम्यान प्रा.लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा देण्याच्या दृष्टीने काही पक्षांनी प्रयत्न सुरू केले असून त्या दृष्टीने निर्णय अंतिम टप्प्यात असल्याची माहिती मिळाली आहे तसे झाल्यास प्रा.पार्सेकर यांनी बाजू आणि भक्कम होणार आहे.