प्रतिनिधी / बेळगाव
माजी सैनिकांतर्फे (22 मराठा) हैद्राबाद गुरुवारी कॅम्प येथील गोगटे रंगमंदिरात 50 वा हिली (विजय) डे साजरा करण्यात आला. यानिमित्ताने वीरपत्नी आणि निवृत्त लष्करी अधिकाऱयांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर ब्रिगेडियर सुरेश मूर्ती, गीता डडकर, कर्नल एस. जी. शिंदे, मेजर ए. बी. नानावली, कर्नल एस. एस. हेरवाडकर, ब्रिगेडियर जी. इलगोवन, सुभेदार मेजर ऑन. कॅप्टन दिलावर मुलानी, सुभेदार मेजर, ऑन. कॅप्टन संभाजी भिसुरकर, नायक यल्लाप्पा यल्लूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. स्नेहा पाटील हिने गीत सादर केले. यावेळी 1971 च्या युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या वीरपत्नी आणि या युद्धात सहभागी झालेल्या जवानांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देवून सत्कार करण्यात आला.
यावेळी देशाच्या सुरक्षततेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता आपले जवान सीमारेषेवर आहोरात्र सज्ज असतात. त्यांचे कार्य हे राष्ट्राच्या विकासासाठी मोठे आहे. त्याबरोबर सैन्यात दाखल होणाऱया जवानांचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याचे विचार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. व्यंकटेश डेगवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सादर केला. निवृत्त सुभेदार फारीख यांनी ढलता सुरज ‘धीरे धीरे ढल जाएगा’ ही कवाली सादर केली. यानंतर बालचमूंचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. याप्रसंगी ऑन. कॅप्टन गिरीश कुमार, कर्नल के. आर. आचार्या, सुभेदार मेजर बी. एस. गावडे, सुभेदार मेजर मनोहर निंबाळकर, सुभेदार नामदेव कसालकर, नायक सुभेदार रफीक फौजदार, सुभेदार सनदी, सुभेदार कृष्णा पाटील, सुभेदार कृष्णा पाटील, हवालदार जांबोटकर, विनायक जाधव यासह माजी सैनिक उपस्थित होते.