प्रतिनिधी /बेळगाव
माजी सैनिक संघटना बेळगाव जिल्हा रजि. नं. 40/76-77 ची वार्षिक सभा संघटनेच्या कार्यालयात ऑक्ट्रॉय नाका, शौर्य चौक येथे खेळीमेळीत पार पडली. अध्यक्षस्थानी संघटनेचे चेअरमन सुभेदार के. बी. नौकुडकर होते. सभेसाठी संचालक मंडळ व सर्व सभासद उपस्थित होते.
सर्वप्रथम उपस्थितांचे स्वागत ऑ. कॅप्टन लक्ष्मण मुंगारे यांनी केले. त्यानंतर हुतात्मा जवान व कोरोनामुळे मृत्यू झालेल्या माजी सैनिकांना मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संघटनेचा वार्षिक अहवाल व ऑडिट रिपोर्टचे वाचन संघटनेचे सचिव गंगाराम गवस यांनी केले.
त्यानंतर संघटनेचे जनरल सेपेटरी के. जे. बाळेकुंद्री यांनी संघटनेच्या आतापर्यंतच्या वाटचालीचा आढावा घेत संघटनेच्या कार्याची माहिती दिली. संघटनेने वर्ष 2020-21 या वर्षात केलेल्या सार्वजनिक कार्याबद्दल संघटनेचे चेअरमन यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कायदा सल्लागार म्हणून ऍड. बाळकृष्ण भरमानी व सीए ऍड. सुनील कलबुर्गी यांना वर्ष 2021-22 साठी नियुक्त करण्यात आले.
तसेच संघटनेच्या कार्याचा आढावा घेताना कोविड-19 ही महामारी अजून संपलेली नाही तर तिसऱया लाटेचा धोका आहे. सर्वांनी आपली व आपल्या परिवाराची काळजी घेण्याचे आवाहन नौकुडकर यांनी केले.
संघटनेच्या पुढील प्रगतीसाठी खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेतर्फे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी माजी सैनिक संघटनेचे उपाध्यक्ष सुभेदार सी. आर. बेळगावकर, छाया शिंदे, संचालक हिराबाई कोंडावडे, देवीदास गावडे, रामा कोलेकर, अशोक पाटील, हनुमंत गुरव, पांडुरंग पाटील, ऑ. कॅप्टन नारायण पाटील, रूपा देवण तसेच खानापूर तालुका माजी सैनिक संघटनेचे सदस्य उपस्थित होते. संघटनेचे उपाध्यक्ष मु. सी. आर. बेळगाव यांनी आभार मानले. सूत्रसंचालन ऑ. कॅप्टन लक्ष्मण मुंगारे यांनी केले.