कायमस्वरूपी वायरमन देण्याचे वीज वितरणचे लेखी आश्वासन
ओटवणे / प्रतिनिधी-
माडखोल गावातील विज समस्या सोडवण्यासाठी येत्या चार दिवसात तात्पुरत्या स्वरूपात स्वतंत्र वायरमनची चार दिवसात नेमणूक करू तर कायमस्वरूपी वायरमन हा नवीन बदली धोरणांमध्ये देण्याचे लेखी आश्वासन सावंतवाडी उपअभियंता एस. एस. भुरे यानी दिल्याने माडखोल ग्रामस्थांनी विज वितरणच्या अनागोंदी कारभार विरोधात पुकारलेले रस्ता रोको आंदोलन स्थगित केले.
यावेळी माडखोल शाखा अभियंता पी. डी. चव्हाण, सावंतवाडी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासो बाबर, जॅकी डिसोजा, माजी सरपंच सूर्यकांत राऊळ, संजय लाड, सरपंच संजय शिरसाट, उपसरपंच शिवाजी परब, संतोष राऊळ, पोलीस पाटील राऊत, सामाजिक कार्यकर्ते राजकुमार राऊळ, जीजी राऊळ, विजय राऊळ आदी माडखोल गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.