म्हसवड / प्रतिनिधी :
बहुचर्चित माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला. 12 जुलै रोजी उमेदवारी अर्ज दाखल करणे, 7 ऑगस्टला मतदान तर 8 ऑगस्टला निकाल लागणार आहे. आज अधिकृतरित्या हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
6 जुलै रोजी निवडणूक कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 6 जुलैला सकाळी अकरा वाजल्यापासून 12 जुलै रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करणे. 13 जुलै रोजी सकाळी 11 पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येईल. 14 जुलै सकाळी 11 वाजल्यापासून 28 जुलै दुपारी 3 पर्यंत अर्ज मागे घेता येतील.
29 जुलै सकाळी 11 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करुन चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे. आवश्यक असल्यास 7 ऑगस्ट रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत मतदान घेण्यात येईल. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. 8 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे.