ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात मुख्यतः मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यातच अजून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बाहेर तैनात असलेल्या तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
याआधी देखील मातोश्री परिसरातील चहावाल्याला कोरोनाची बाधा झाली होती. त्यावेळी त्याच्या संपर्कातील 130 पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर आता त्याच परिसरतील तीन पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, या पैकी 2 पोलीस काल रात्री ड्युटी करून आपल्या घरी गेले होते. तर एक पोलिस आज पण ड्युटीवर होता. या तिन्ही पोलिसांना सांताक्रुजमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांची दोन दिवसांपूर्वीच टेस्ट करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आज सकाळी आले. त्यावरून त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मुक्काम सध्या मातोश्रीवर आहे. सध्या एकट्या मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 5 हजारच्या वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईत चिंताजनक स्थिती निर्माण झाले आहे.