इस्रायलच्या जेरूसलेममध्ये हस्तगत
इस्रायलच्या वैज्ञानिकांनी डेव्हिड नॅशनल पार्क जेरूसलेम येथून तेलाने पेटणारा एक प्राचीन कांस्याचा दिवा हस्तगत केला आहे. संशोधकांनी या दिव्याला ‘अत्यंत खास’ आणि इस्रायलमधील अशाप्रकारचा हा पहिलाच शोध असल्याचे म्हटले ओ. कांस्य धातूचा हा दिवा 1900 वर्षे जुना असल्याचा अनुमान आहे. या कलाकृतीची आकृती हसणाऱया मानवी चेहऱयासारखी आहे.
रोमन थिएटरमध्ये वापरल्या जाणाऱया मास्कप्रमाणेच हा दिवा आहे. याचमुळे हा अत्यंत विशेष आहे. पण या दिव्याचा केवळ निम्मा हिस्साच राहिला आहे. या दिव्याला भिंतीवर टांगले जात असावे. तसेच धार्मिक विधीदरम्यान त्याचा वापर होत असावा, असा वैज्ञानिकांचा अनुमान आहे.
हा दिवा हस्तगत झाल्यावर इस्रायलच्या पुरातत्व मंत्रालयाने हंगेरीतल एका पुरातत्वतज्ञाशी संपर्क साधला आहे. हा दिवा बूडापेस्टमध्ये रोमन अवशेषांमध्ये सापडलेल्या दिव्याशी साधर्म्य दर्शविणारा असल्याचे मानले जात आहे.