सातारा / प्रतिनिधी :
यवतेश्वर येथील कास फुड्स या हॉटेलमध्ये युवकास मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार यवतेश्वर येथील कास फुड्स या हॉटेलमध्ये ओंकार किसन कोकरे (वय 21) यास अनिल लोटेकर याने दि. 30 रोजी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास मारहाण केली. त्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, सातारा तालुका पोलीस याचा तपास करत आहेत.