केरळमध्ये भव्य म्युझियमची योजना
वृत्तसंस्था/ कोची
अर्जेंटिनाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू दियागो माराडोनाचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. जागतिक फुटबॉल क्षेत्रात पेले प्रमाणेच माराडोनाचे नावही आघाडीवर घेतले जाते. माराडोनाची आठवण नव्या पिढीतील फुटबॉलपटूंना सदैव रहावी यासाठी केरळमधील एका उद्योगपतीने माराडोनाची स्मृती म्हणून आकर्षक म्युझियम बांधण्याची घोषणा केली आहे.
केरळमधील बॉबी चेमनूर आंतरराष्ट्रीय उद्योग समूहाचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक बॉबी चेमनूर यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली. तब्बल आठ वर्षापूर्वी केरळमध्ये फुटबॉल हा क्रीडा प्रकार सुरू करण्यामध्ये त्यांचा सहभाग महत्त्वाचा होता. 1986 च्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद मिळविणाऱया अर्जेंटिना संघाकडून माराडोनाने महत्त्वाचा आणि निर्णायक गोल नोंदविला होता. माराडोनाच्या स्मृतीप्रित्यर्थ या नियोजित म्युझियमची स्थापना सुरुवातीला कोलकातामध्ये करण्याचे ठरले होते. पण आता ते दक्षिण भारतातील कोची येथे स्थापन होणार आहे. या म्युझियमसाठी मोठा भूखंड खरेदी करण्यात येणार आहे. या म्युझियममध्ये माराडोनाचा सुवर्ण पुतळा बसविण्यात येणार आहे. 2011 साली दुबईत बॉबी चेमनूर यांनी माराडोनाची भेट घेतली होती. दुबईत उद्योगपती चेमनूर यांच्या ज्वेलरी शोरुमचे उद्घाटन माराडोनाच्या हस्ते करण्यात आले होते. या समारंभावेळी चेमनूर यांनी माराडोनाला त्याचीच सुवर्ण प्रतिमा भेट म्हणून दिली होती.