चिपळूण
तालुक्यातील मार्गताम्हाने बाजारपेठेत प्रौढाला दोघांनी मारहाण केल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4.30 च्या सुमारास घडली. या प्रकरणी दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मारामारीत जखमी झालेल्या हनुमंत तुकाराम पवार (50, गुहागर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार विनय बाजीराव चव्हाण, सरिता विनय चव्हाण (दोन्ही, उभळे-चिपळूण) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार हे चव्हाण याच्या मालकीच्या चिरेखाणीवर मुकादम म्हणून काम करीत होते. 27 जानेवारी रोजी सायंकाळी 4.30 वाजता चव्हाण याने पवार यांना फोन करुन आपल्याला पोलीस स्टेशनला जायचे आहे, असे सांगून आपल्या नॅनो गाडीमध्ये बसण्यास सांगितले. यावेळी पवार हे मार्गताम्हाने बाजारपेठेत आले असता चव्हाण याने ‘तू माझे काम का करत नाहीस’ असे विचारून पवार यांना शिवीगाळ करत हाताने तर सरिता चव्हाण हिने दगडाने मारहाण केली. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नामदेव जाधव करीत आहेत.