प्रतिनिधी / सातारा :
स्वच्छतेच्या बाबतीत सातारा जिल्हा नेहमीच आग्रेसर आहे, याचच एक भाग म्हणून महास्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) टप्पा क्रमांक 2 अंतर्गत जिल्हय़ात 155 सार्वजनिक शौचालय युनिटसाठी 4 कोटी 65 लाख रूपये तर वैयक्तिक 2 हजार 867 शौचालयासाठी 3 कोटी 44 लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. येत्या मार्चअखेर पर्यंत ही शौचालये पूर्ण करण्याचे उद्दिष्टय़ देण्यात आल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली आहे. या पुढेही जिल्हा स्वच्छतेबाबतीत आग्रेसर रहावा याकरीता हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
जिल्हय़ातील मोठय़ा लोकसंख्येच्या गावांमध्ये सार्वजनिक शौचालय युनिटसाठी 3 लाख रूपयांचा निधी देण्यात येत आहे. 1 लाख 26 हजार रूपये केंद्र शासन, 84 हजार रूपये राज्य शासन व संबंधित ग्रामपंचायतींकडून 90 हजार रूपये अशा निधी उपलब्ध करण्यात येणार आहे. यावर्षी जिल्हय़ात 155 सार्वजनिक शौचालय युनिटचे उद्दिष्ट देण्यात आले असून त्यासाठी 4 कोटी 65 लाख रूपयांचा निधी तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे. दि. 31 मार्च अखेर ही कामे पूर्ण करण्याच्या सुचना दिल्याचे जि.प. अध्यक्ष उदय काबुले व उपाध्यक्ष प्रदिप विधाते यांनी सांगितले.
तसेच जिल्हय़ात वैयक्तीक शौचालयाचे 2 हजार 870 उद्दिष्ट असून, प्रती शौचालय 12 हजार रूपये अनुदान देण्यात येणार आहे. त्यासाठी 3 हजार कोटी 44 लाख रूपयांचा निधी मंजुर असून निधीचे तालुकास्तरावर वितरण करण्या आले आहे. केंद्र सरकार 60 टक्के व राज्य सरकार 40 टक्के निधी यासाठी देत आहे. सार्वजनिक आणि वैयक्तिक शौचालयांची बहुतांश कामे पूर्ण झाली असून, उर्वरित कामे मार्चअखेर होतील, असे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व उपमुख्य कार्यकारी अधिकारी निकरण सायमोते यांनी कळविले आहे.
जिल्हय़ातील एकूण शौचालयांची आकडेवारी
तालुका सार्वजनिक शौचायले वैयक्तीक शौचालये
सातारा 8 381
कोरेगाव 15 350
खटाव 9 207
माण 15 550
फलटण 15 122
खंडाळा 18 150
वाई 15 270
जावली 12 325
महाबळेश्व 14 200
कराड 9 157
पाटण 25 158
एकुण 115 2870