वेंगुर्ले (वार्ताहर)-
महाराष्ट्र आणि गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल टुरीझम समिट अँण्ड अवॉर्ड या संस्थेचा विविध क्षेत्रातील कर्तत्ववान 5 व्यक्तींना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांत कृषी क्षेत्रात हापूस आंब्याच्या बाबतीत राज्यात प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल मालवण-कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम फोंडेकर यांना सन्मानाचा आंतरराष्ट्रीय स्तरावरील `इंटरनॅशनल प्राइम अँग्रीकल्चर अवॉर्ड’ पणजी येथील मेनेजीस ब्रगेंझा सभागृहात गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या हस्ते वितरीत करण्यांत आला.
या पुरस्काराचे वितरण प्रसंगी ज्योतिबा जयमल्हार मालिकेतील कलाकार विश्वजीत पाताडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक आर. वाय. पाटील, सौ. प्रत्युषा फोंडेकर आणि अन्य मान्यवरांचा समावेश होता.
संपूर्ण महाराष्ट्र व गोवा राज्यात कृषी क्षेत्रात हापूस आंब्याच्या बाबतीत प्रथम उत्पादन घेण्याच्या कार्याबद्दल त्यांना मानाचा आंतरराष्ट्रीय दर्जाचा इंटरनॅशनल प्राइम अँग्रीकल्चर अवॉर्ड देण्यात आला. या पुरस्काराचे स्वरूप मेडल, मानपत्र तसेच स्मृतिचिन्ह त्यांना बहाल करण्यात आले. उत्तम फोंडेकर यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.
बदलत्या हवामानात होणाऱ्या किटकांच्या प्रादुर्भावांत आंबा पिक टिकविणे. हे फार जिकरीचे असताना वेळच्या वेळी योग्य ती उपाय योजना कोकणातील आंबा बागायतदार अथक परीश्रम आणि उच्च तंत्रज्ञानाच्या आधारे घेतात. हे मालवण कुंभारमाठ येथील उत्तम फोंडेकर यांनी दाखवून देत, त्यावर मात करीत सलग तीन वर्षे फलोत्पादन क्षेत्रात नोव्हेंबर मध्ये हापूस आंब्याचे उत्पन्न घेऊन शेतकऱ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या कार्यक्रमांत अवेळी वातावरण बदलातही त्याचे परीणाम जाणून घेऊन हापूस आंब्याचे पिक आंबा हंगामात सर्व प्रथम घेण्याच्या उत्तम फोंडेकर यांच्या कार्याचा गौरव पणजी येथील आयोजित सत्कार कार्यक्रमांत मेनेजीस ब्रगेंझा सभागृहात आयोजकांनी केला.