प्रतिनिधी /काणकोण
माशे येथील श्री निराकार देवस्थानच्या अध्यक्षपदी नारायण गोविंद प्रभुगावकर यांची 2022 ते 2025 या कालावधीसाठी निवड झाली आहे. या कार्यकारिणीवर उपाध्यक्ष विठ्ठल रामचंद्र प्रभुगावकर, सचिव राजेंद्र अनंत वारीक, सहसचिव अमेय व्यंकटेश प्रभुगावकर, खजिनदार दुर्गेश लक्ष्मीकांत वारीक, सहखजिनदार सुहास व्यंकटेश वारीक, मुखत्यार वल्लभ केशव प्रभुगावकर आणि सहमुखत्यारपदी प्रकाश अनंत वारीक यांची निवड झाली आहे.