प्रतिनिधी / मडगाव
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी ‘मास्क’ घालण्याची सक्ती सरकारने केली आहे. त्यामुळे घरातून बाहेर पडताना मास्क न घातल्यास आत्ता पोलीस थेट कारवाई करीत असून दक्षिण गोव्यात आत्ता पर्यंत 3636 जणांवर कारवाई केल्याची माहिती दक्षिण गोव्याचे पोलीस अधीक्षक अरविंद गांवस यांनी दिली आहे.
दक्षिण गोव्यात मडगाव विभागातील, मडगाव, मायणा-कुडतरी, कोलवा, कुंकळळी व फातोर्डा या पाच पोलीस स्थानकांच्या हद्दित मास्क न वापरणाऱया 1152 जणांवर कारवाई झाली आहे. तर केपे विभागातील केपे, कुडचडे, सांगे व काणकोण या चार पोलीस स्थानकांच्या हद्दित 363 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
वास्को विभागातील वास्को, वेर्णा, मुरगांव, वास्को रेल्वे व दाबोळी विमानतळ पाच पोलीस स्थानकांत 1257 जणांवर कारवाई झाली आहे. तर फोंडा विभागात फोंडा व कुळे या दोन पोलीस स्थानकांच्या क्षेत्रात 782 जणांवर कारवाई झालेली आहे. तर मडगाव कोकण रेल्वे पोलीस स्थानकाच्या क्षेत्रात 82 जणांवर कारवाई करण्यात आली. मास्क न वापरणाऱयावर दंडात्मक कारवाई केली जात असून त्यांतून पोलिसांनी बऱयापैकी महसूल प्राप्त केला आहे.
पोलिसांनी गोळा 57,55,431 रूपयांचा महसूल
दक्षिण गोव्यात पोलिसांनी 144 कलमांचा भंग केल्या प्रकरणी 352 जणांवर गुन्हा नोंद केला आहे. तर 751 जणांना अटक केली व 261 वाहने ताब्यात घेतली. तसेच सार्वजनिक ठिकाणी उघडय़ावर थुंकल्या प्रकरणी 3975 जणांवर कारवाई केली आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील अनेकांनी वाहतूक नियमाचा भंग केल्याने 41174 जणांवर कारवाई केली आहे. मास्क न घालणे, उघडय़ावर थुंकणे व वाहतूक नियमांचा भंग करणाऱयावर दंडात्मक कारवाई करताना 57,55,341 रूपयांचा महसूल प्राप्त केला आहे.
वाहतूक नियमांचा भंग करण्यात आल्याने मडगाव विभागात 15791 वाहन चालकांवर कारवाई झालेली आहे. तर केपे विभागात 7113 तर, वास्को विभागात 9041 आणि फोंडा विभागात 7953 जणांवर कारवाई झालेली आहे. मडगाव कोकण रेल्वे विभागात 1246 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
या पुढे ही कारवाई अशीच चालू रहाणार असून लोकांनी कोरोना पासून स्वताचा बचाव करण्यासाठी मास्क वापरावे तसेच जमाव बंदीचे पालन करावे व वाहतूक नियम भंग करू नये असे आवाहन पोलीस अधीक्षक श्री. गांवस यांनी केले आहे.