ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
आज (दि.12) सकाळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले. त्यानंतर काही फसव्या लिंक या अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आल्या. दरम्यान, काही वेळातच मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आले असून, हॅकर्सने केलेले फसवे ट्विट हटविण्यात आले. मंत्रालयाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज बुधवारी सकाळच्या सुमारास माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे हॅक करण्यात आले. हॅकर्सनी या खात्याचे नाव ‘एलॉन मस्क’ असे ठेवून त्यावरुन एक मोठा कार्यक्रम होणार असल्याचे ट्विट केले. त्यानंतर काही फसव्या लिंक देखील या अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आल्या होत्या. मात्र, काही वेळातच वेळातच मंत्रालयाच्या ट्विटर अकाऊंटवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. त्यानंतर हॅकर्सने केलेले ट्विट हटविण्यात आले. दरम्यान, या प्रकारामुळे सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.