बालपणीचे स्वप्न करू शकता साकार
अनेक लोक कार्टून व्यक्तिरेखांचे चाहते असतात. असे लोक नेहमीच कार्टून्सच्या जादुई जगात जाण्याची इच्छा बाळगून असतात. अशा लोकांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. डिस्ने एक असेच जादुई जग आता वसविणार असून तेथे लोक स्वतःच्या आवडत्या कार्टुन कॅरेक्टर्ससोबत राहू शकतील. या शहराला ‘कोटिनो’ नाव देण्यात आले आहे. कार्टून प्रेमींसाठी हे जगातील सर्वात सुंदर ठिकाण असणार आहे.
मिकी माउस असणार सोबत
या थीम पार्कमध्ये कार्टून प्रेमींना स्वतःच्या आवडत्या कार्टून कॅरेक्टर्ससोबत रहावे लागेल. पूर्ण थीम त्याचवर आधारित असणार आहे. पार्कमध्ये 1900 घरांची निर्मिती केली जाणार आहे. याचबरोबर 400 खोल्यांचे एक हॉटेल देखील असणार आहे. यामुळे पर्यटक देखील या जादुई जगाचा हिस्सा होऊ शकतील. येथे राहणाऱयांना कार्टूनच्या जगाचा आभास होईल अशाप्रकारे हे पार्क निर्माण केले जाणार आहे.
कॅलिफोर्नियाच्या वाळवंटात असणार शहर
618 एकरच्या या जादुई जगाला अमेरिकेच्या कॅलिफोर्निया येथील वाळवंटात वसविण्यात येत आहे. येथील नैसर्गिक दृश्य अत्यंत सुंदर असते. यामुळे या जागेची निवड ‘कोटिनो’साठी करण्यात आली आहे.
खरेदी करू शकता स्वप्नांचे घर
कोटिनोमध्ये तुम्ही स्वतःच्या स्वप्नांचे घर खरेदी करू शकता. कोटिनोत राहणे हे स्वप्नांच्या जगात राहण्यासारखेच असणार आहे. येथे तुम्ही स्वतःला डिस्ने वर्ल्डचा हिस्सा करू शकाल असे उद्गार डिस्ने पार्कचे अध्यक्ष जोश डिएमरो यांनी काढले आहेत.