वृत्तसंस्था/ मिडलसेक्स
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज रिचर्ड जॉन्सनची इंग्लिश कौटीं क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया मिडलसेक्स क्रिकेट क्लबच्या प्रमुख प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे जॉन्सनचे मिडलसेक्स क्लबमध्ये पुनरागमन झाले.
47 वर्षीय जॉन्सनने यापूर्वी सरे क्रिकेट क्लबच्या सहाय्यक प्रशिक्षकपदी सेवा बजावत होता. 2022 इंग्लिश कौंटी क्रिकेट हंगामासाठी आता जॉन्सनचे मिडलसेक्स संघात पुनरागमन झाले असून तो फेब्रुवारी महिन्याच्या उत्तरार्धात या संघामध्ये दाखल होईल. यापूर्वी म्हणजे 2011 साली जॉन्सन मिडलसेक्स संघाच्या प्रशिक्षक पथकात पहिल्यांदा दाखल झाला होता. 2019 साली जॉन्सनने मिडलसेक्स क्लबला निरोप दिल्यानंतर या संघाच्या नव्या प्रमुख प्रशिक्षकपदी स्टुअर्ट लॉची नियुक्ती करण्यात आली होती.