दापोलीकरांना भरली हुडहुडी, पारा 11.2 अंश सेल्सिअस
वार्ताहर/ मौजेदापोली
दापोलीच्या पाऱयात कमालीची घसरण होत असल्याने दापोलीकरांना चांगलीच हुडहुडी भरली आहे. त्यामुळे दापोलीतील आंबा, काजू बागायतदार चांगलेच सुखावले आहेत.
वाऱयासह मुसळधार पडणाऱया पावसानंतर आता गुलाबी थंडीला सुरूवात झाली आहे. बुधवारी दापोलीचा पारा 11.2 अंश सेल्सिअस असल्याचे दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
दापोलीत झालेल्या चक्रीवादळामुळे अनेक काजू, आंबा बागायतींचे अतोनात नुकसान झालेले आहे. बुधवारी रात्रीपासून गुरूवारपर्यंत चांगल्याप्रकारे थंडी पडली. त्यामुळे अनेकांनी कपाटात ठेवलेले स्वेटर बाहेर काढले असून शेकोटय़ा पेटवण्यासदेखील सुरूवात केली आहे. मौसमी पाऊस ऑक्टोबर महिनाअखेरपर्यंत होता. त्यामुळे थंडीचे आगमन लांबले होते.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात गार वारे वाहण्यास सुरूवात झाली, परंतु त्यानंतर बुधवारी रात्रीपासून गुरूवारी दुपारपर्यंत वातावरणात चांगलाच थंडावा जाणवत होता. अशीच थंडी राहिली तर आंबा, काजू बागायतींना चांगला फायदा होईल, असा विश्वास दापोलीतील नागरिकांनी व्यक्त केला.