प्रतिनिधी /मिरज
शहरातील सांगलीवेस, संत रोहिदास चौक येथे राहणाऱ्या अभिजित दिलीप सातपुते (वय 26) या तरुणाने गुरुवारी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत मिरज शहर पोलिसात नोंद झाली आहे.
अभिजित हा गेल्या काही दिवसांपासून नैराश्येत होता. गुरुवारी सकाळी 11 वाजता घरात कोणी नसल्याचे पाहून त्याने विषारी औषध प्राशन केले. नातेवाइक घरी आल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.