पार्किंग समस्या न सोडविल्यास धरणे आंदोलन
प्रतिनिधी/मिरज
शहरातील पार्किंग व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे. मागील महिन्यात आम आडमीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका अतिरिक्त आयुक्तांची भेट घेऊन पार्किंग समस्येबाबत माहिती देऊन कारवाई करण्याची मागणी केली होती. मात्र महिना होत आला तरी महापालिकेने कारवाई केली नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी आम आदमीच्या कार्यकर्त्यांनी महापालिका सहाय्यक आयुक्तांच्या केबिन समोर ठिय्या मारला. यावेळी पार्किंग समस्येबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. महापालिका क्षेत्रातील पार्किंगची जागा गिळंकृत करणाऱ्या हॉस्पिटल, दुकाने आणि सदनिका धारकांची नावे देऊनही कारवाई न झाल्याने महापालिकेच्या दिरंगाई बद्दल निषेध नोंदविण्यात आला. पार्किंग प्रश्न. तत्काळ मार्गी न लावल्यास महापालिकेच्या विरोधात धरणे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.