शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बनले कोरोनाचा हॉटस्पॉट, 90 जणांची तपासणी, पॉझिटीव्ह रुग्णांचे स्वॅब ओमिक्रॉन तपासणीसाठी पुण्याला
प्रतिनिधी / मिरज
मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय पुन्हा एकदा कोरोना उद्रेकाचे हॉटस्पॉट बनले आहे. सोमवारी वसतीगृहातील सात विद्यार्थी कोरोना बाधित आढळले होते. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 90 जणांची कोरोना चाचणी केली असता आणखी 32 विद्यार्थी मंगळवारी दुपारी कोरोना बाधित असल्याचे आढळून आले आहे.
त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. पॉझिटीव्ह आलेल्या सर्व रुग्णांचे स्वॅब ओमिक्रॉन तपासणीसाठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरालॉजी प्रयोगशाळेकडे पाठविले असल्याची माहिती मिरज शासकीय रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.