4 जानेवारी रोजी संघ तेलंगणला रवाना होणार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
6 ते 9 जानेवारीदरम्यान होणाऱया 13 व्या मिस्टर इंडिया पुरुष वरिष्ट राष्ट्रीय शरीरसौष्टव व फिजिक्स स्पोर्ट्स स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य शरीरसौष्टव संघाची निवड करण्यात आली असून तेलंगण येथील खमाम येथे ही स्पर्धा भरविली जाणार आहे.
कर्नाटक संघात 55 किलो गटात बसवाणी गुरव, 60 किलो गटात उमेश गंगने, 65 किलो गटात अरुण गौडा, 70 किलो गटात प्रताप कालकुंद्रीकर प्रतिनिधित्व करतील. याशिवाय, 75 किलो गटात टी. के. नायक, वरुणकुमार, 80 किलो गटात राहुल सिंग, प्रशांत, 85 किलो गटात रुबेल कोटियन, चेतनकुमार, 90 किलो गटात विकास सूर्यवंशी, 85 किलो गटात नित्यानंद कोटियन यांची निवड करण्यात आली आहे.
त्याचप्रमाणे पुरुष स्पोर्ट्स फिजिक्स 165 सेंमी गटात मंजुनाथ ए., हितेश, 165 से.मी. गटात श्री साईकुमार, संदेश एस. एन. व राम बी. यांचा समावेश आहे.
या संघाचे व्यवस्थापक दिलीपकुमार, प्रशिक्षक एम. गंगाधर, पंच म्हणून उमा महेश अशी निवड करण्यात आली आहे. हा संघ 4 रोजी राष्ट्रीय स्पर्धेसाठी खमाम तेलंगणा येथे रवाना होणार आहे.
दि. 6 जानेवारी रोजी स्पर्धकांची नोंदणी होणार असून त्यानंतर वजने घेतली जाणार आहेत. दि. 7 रोजी जजिंग होणार असून 8 रोजी अंतिम स्पर्धा होणार आहे.
त्यानंतर बक्षीस वितरण होईल. या स्पर्धेसाठी देशातील स्पर्धांचे सचिव उपस्थित राहणार आहेत. कर्नाटकाचे स्पर्धा सचिव अजित सिद्दण्णावर यांनी ही माहिती दिली.