सातारा / प्रतिनिधी :
मी प्युअर मराठा आहे, हे मला माहिती आहे. राज्यातील मराठा नेत्यांसह मराठा तरुणांना माहिती आहे. मी कधीही मराठा समाजाचे भावनिक राजकारण केले नाही. मी कोणाच्या आव्हानाला भीक घालत नाही. ‘त्या’ युवकांना सहकार्य करतो आहे. त्यांच्या संरक्षणासाठी हा शशिकांत शिंदे समर्थ आहे. मराठा आंदोलनावेळी मराठा नेत्यांनी विधी मंडळांच्या आमदारांची बैठक बोलावली होती. त्यावेळी यादी काढली तरी मराठा समाजाचा कोणाला कळवला आहे हे समजेल, असे प्रतिउत्तर आमदार शशिकांत शिंदे यांनी नरेंद्र पाटील यांना दिले.
माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केलेल्या टिकेनंतर आमदार शशिकांत शिंदे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, मी मराठा आहे की नाही, हे मला माहिती आहे. राज्यातील मराठा नेत्यांसह तरुणांना माहिती आहे. मी प्युअर मराठा आहे. दोन गोष्टीचे स्पष्टीकरण करतो. मी मराठा समाजाचे भावनिक राजकारण करत नाही. मी प्रामाणिकपणाने मराठा समाजाचे काम करतो. ज्या-ज्या वेळेला महाराष्ट्रात मराठा आंदोलन झाले, त्या-त्या वेळेला शशिकांत शिंदे प्युअर मराठा म्हणून आंदोलनात उतरले. अगदी आझाद मैदानापर्यंत. सातारा जिल्ह्यात तोडफोड झाली त्यावेळी माझंच नाव आलं. दुसऱ्या कोणत्या नेत्याचं नाव आलं नाही.
त्यानंतर कंळबोली, नवी मुंबई येथे अनेक मराठा तरुण अडचणीत आले. त्यावेळेला स्वतःहुन पुढाकार घेत होतो आणि घेत राहिलेलो आहे. मराठ्यांना आधार देत राहिलो. ‘त्या’ मुलांना सुद्धा आता मीच मदत करतो. भावनिक असतात, त्यावेळी त्या तरुणांचा रोष असतो, त्या तरुणांनी निर्णय घेतला. त्यांच्या घरी जाऊन कुठेही दमबाजी केली नाही त्यांनी बघावं. मी त्यांच्या कुटुंबियांना विनंती केली. त्यांना सांगितले की एका पक्षाने अशा प्रकारचा निर्णय घेतला नाही.
नरेंद्र पाटील ज्यांचे समर्थन करतात त्या पक्षाची धोरण स्पष्ट व्हावीत. देवेंद्र फडणवीस असतील की त्यांचे नेते असतील. 102 ची घटना दुरुस्ती कोणी केली त्यांनीच. कायदा त्यांनीच केला. तो पुढं नेण्याचं काम सरकार बदलल्यानंतर या सरकारने केलं. पूर्ण अभ्यास करावा. जनतेच्या भावनेशी खेळू नये, अशी टिप्पणी नरेंद्र पाटील यांच्यावर केली.
पुढे ते म्हणाले, त्या मुलांना आता सुद्धा त्यांची भावना कळल्यानंतर मी समज दिल्यानंतर कोण कुठल्या राजकिय पक्षाचे आहे. हे मला ही माहिती आहे. आज त्यांना जेवढं सहकार्य करतो आहे. पूर्ण त्यांना माहिती नाही. राहिले त्यांच्या केसाला धक्का लागायचा प्रश्न. त्यांचे संरक्षण करायला हा शशिकांत शिंदे समर्थ आहे. मी कोणाच्या आव्हानाला कधी भीक घालत नाही, असा ही टोला लगावला.
पुढे आरक्षण द्यायला सरकार कमी पडले का या प्रश्नी ते म्हणाले, ज्यांची भूमिका स्पष्ट आणि प्रामाणिक असते. त्यांना भीती नसते. मी आज ही म्हणतो. ज्या वेळेला मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले. त्यावेळी कोण कुठं होते? कोणत्या पक्षाला धरून होता?, आम्ही कोणत्याही पक्षाचे जरी असलो तरी मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये पुढे होतो. अगदी विधी मंडळांच्या आमदारांची बैठक मराठा नेत्यांनी बोलवल्यानंतर जे आमदार हजर होते ती यादी काढा. त्या यादीमध्ये कोण आमदार, खासदार हजर नव्हते त्याच्यावर मराठा समाजबद्दल कोणाला कळवळा आहे हे दिसून येईल.