प्रति 10 ग्रॅम 1,900 रुपयांची घट : चांदी दरात किरकोळ वाढ
मुंबई, नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुंबईत गुरुवारी सोन्याच्या दरात घट दिसून आली. सोने प्रति 10 ग्रॅम 1,900 रुपयांनी घट झाली. 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 48,850 रुपयांवर सुरू आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅमसाठी 47,850 रुपयांवर सुरू आहे. गेल्या सत्रात 24 कॅरेट सोन्याचा दर 50,750 रुपयांवर बंद झाला होता. 22 कॅरेट सोन्याचा दर 49,750 रुपयांवर बंद झाला होता. सोन्याच्या दरात घट झाली असली तरी महाराष्ट्रात चांदीच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. बुधवारी 60,000 वर असलेली चांदी गुरुवारी 60,050 रुपयांवर पोहोचली होती.
दिल्लीतील स्थानिक बाजारात गुरुवारी सोने आणि चांदीच्या किंमतीत किरकोळ वाढ पाहायला मिळाली. एचडीएफसी सिक्मयोरिटीजनुसार राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये सोन्याची किंमत 17 रुपयांनी वाढून 48,257 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली होती. गेल्या सत्रात हा दर 48,240 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाला होता. दुसरीकडे चांदी 28 रुपयांच्या तेजीसह 59,513 रुपये प्रतिकिलो झाली होती. गेल्या सत्रात बुधवारी ती 58,380 रुपये प्रति किलोवर बंद होती. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात सोने वाढीसह 1,815 अमेरिकन डॉलर प्रतिऔंस आणि चांदी 23.42 डॉलर प्रतिऔंसवर होती.