मुंबई विमानतळाची हिस्सेदारी अदानी समूह करणार खरेदी
वृत्तसंस्था/ मुंबई
दिग्गज व्यावसायिक गौतम अदानी यांच्या नेतृत्वातील अदानी समूह आता मुंबई इंटरनॅशनल लिमिटेडची (एमआयएएल) 74 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. या संदर्भात अदानी समूह आणि जीव्हीके समूहामध्ये एक करार करण्यात आला आहे. मुंबई विमानतळ हे देशातील दुसऱया नंबरचे सर्वात मोठे विमानतळ असल्याने या व्यवहाराकडे उद्योगजगताचे लक्ष लागून राहिलेले होते. अदानी समूह जीवीके समूहाची संपूर्ण 50.5 टक्के हिस्सेदारी खरेदी करणार आहे. याच्या व्यतिरिक्त अदानी समूह एअरपोर्ट कंपनी ऑफ साउथ आफ्रिका आणि बिडवेस्टमधील 23.5 टक्क्मयांचा हिस्सा खरेदी करणार आहे.
मुंबई विमानतळामध्ये एसीएसएची 10 टक्के आणि बिडवेस्टची 13.5 टक्के हिस्सेदारी आहे. या व्यवहारासोबत अदानी समूह देशातील दुसऱया नंबरचा सर्वात मोठा खासगी ऑपरेटर बनणार आहे. मुंबईसह अदानी समूहाकडे 6 विमानतळांची मालकी मिळणार आहे. सध्याच्या स्थितीत दिल्ली आणि हैदराबाद विमानतळाचा ताबा अदानीकडे आहे.
अदानी फेडणार कर्ज
दोन्ही कंपन्यांच्या दरम्यान करार करण्यात आल्यामुळे मुंबई विमानतळाचा ताबा हा असणाऱया जीवीकेची संपूर्ण कर्जफेड अदानी समूह करणार आहे. त्यामुळे जीवेके एअरपोर्ट डेव्हलपर्सचे कर्ज हे इक्विटीमध्ये बदलणार आहे.