ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर करण्यात आला. महापालिकेच्या शिक्षण विभागाने 2020-21 चा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये 2 हजार 944.59 कोटी रुपयांचा शैक्षणिक अर्थसंकल्प सहआयुक्त आशुतोष सलील यांनी शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांना सादर केला.
यंदाच्या शैक्षणिक अर्थसंकल्पात 210.82 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. गेल्या वषी शिक्षण विभागाने 2 हजार 733.77 कोटींचा शैक्षणिक अर्थसंकल्प सादर केला होता.
– आयसीएससी आणि सीबीएसई शाळा उघडणे, डेटा इंट्री ऑपरेटर्सचे प्रतिनिधी, स्पर्धात्मक परीक्षांसाठी शुल्क भरणे, हेड टीचर्ससाठी 10 हजार रुपयांपर्यंतच्या बिलांना मंजुरी अशा नव्या तरतूदींचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
– व्हर्च्युअल क्लासरुमसाठी प्राथमिक शाळांसाठी ७.२१ कोटींची तरतूद.
– व्हर्च्युअल क्लासरुमसाठी माध्यमिक शाळांसाठी ४.३८ कोटींची तरतूद.
– शालेय विद्यार्थ्यांना मोफत बस सेवा प्रवास
– महापालिकेच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याला शालेय उपयोगी साहित्य गणवेश मोफत वाटप करणार. प्राथमिक शाळांसाठी ८०.६४ कोटी आणि माध्यमिक शाळांसाठी ३१.१८ कोटींची तरतूद.
– विद्यार्थ्यांना आजारांवर आळा घालण्यासाठी हँड सॅनीटायजर बसविणार.