बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. यापार्शवभूमीवर मुख्यमंत्री अधिकारी आणि मंत्र्यांच्या बैठका घेऊन राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेत आहेत. यातच मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी राज्याचे राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली. यांनतर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाच्या निवेदनानुसार राजभवन येथे राज्यपालांशी झालेला संवाद हा “सौहार्दपूर्ण भेटी” चा भाग होता. असे म्हंटले आहे. पण मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली याचा तपशील मात्र समजू शकलेला नाही.