बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी मंगळवारी आरोग्यमंत्री के. सुधाकर, अतिरिक्त मुख्य सचिव (आरोग्य) जावेद अख्तर आणि इतर अधिकाऱ्यांची भेट घेतली. याबैठकीत मुख्यमंत्र्यांनी बेंगळूर आणि राज्यभरात रेमडेसिवीरच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यात ऑक्सिजन व रेमडेसिवीरची कमतरता आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी आरोग्यमंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक घेत राज्यातील आणि रेमडेसिवीरच्या उप्लब्धतेविषयी माहिती घेतली. यांनतर ४ वाजता मुख्यमंत्री मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहेत.