वार्ताहर/ उचगाव
सुळगा (हिं.) येथील शेतकरी शिक्षण सेवा समिती संचलित ब्रम्हलिंग हायस्कूलचे मुख्याध्यापक आर. एन. हुलजी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थांनी संस्थेचे अध्यक्ष देवाप्पा पाटील होते. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष भाऊराव गडकरी, सेपेटरी बी. डी. पाटील, संचालक अशोक पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश महादेव पाटील, प्रकाश लक्ष्मण पाटील, यल्लाप्पा कलखांबकर, डी. एस. पट्टणशेट्टी, महादेव पाटील. पी. जी काकतकर, एल. एस. मेणसे उपस्थित होते.
प्रभारी मुख्याध्यापक पी. एम. मुतकेकर यांनी प्रास्ताविक, स्वागत केले. सरस्वती फोटो पूजन देवाप्पा पाटील यांनी केले. दीपप्रज्वलन भाऊराव गडकरी, अशोक पाटील व इतरांनी केले. शालेयवतीने शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन आर. एन. हुलजी यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
एन. के. चौगुले यांनी समयोचित भाषण केले. भाऊराव गडकरी यांनी हुलजी सरांच्या कार्यपद्धतीमुळे शाळेच्या विद्यार्थ्यांचा झालेला विकास याबाबत माहिती दिली.
यावेळी ब्रम्हलिंग सोसायटी, माजी विद्यार्थी, आताचे विद्यार्थी, ग्रामस्थ, विविध पतसंस्था, युवक मंडळे यांच्यावतीने हुलजी दांपत्यांचा सत्कार केला. सत्काराला उत्तर देताना आर. एन. हुलजी म्हणाले की, या शाळेमध्ये गेली 33 वर्षे मी सेवा बजावली ती या गावातील सर्व नागरिक, पालक, आजी माजी विद्यार्थी यांच्या सहकार्यामुळेच मुख्याध्यापक म्हणून मी यशस्वी झालो.
कार्यक्रमाचे आयोजन प्रकाश गोरल, शरद पाटील, एल. एम. कुरणे, ए. व्ही. परीट, एम. बी. कांबळे यांनी केले होते. सूत्रसंचालन एस. ए. झेंडे यांनी केले. व्ही. सी. अनगोळकर यांनी आभार मानले.