वार्ताहर / सांबरा
मुतगे येथील श्री भावकेश्वरी को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्यावतीने ग्राम पंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे माजी चेअरमन वाय. बी. संभाजीचे होते.
प्रारंभी सेक्रेटरी भाऊराव जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले. चेअरमन बी. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर ग्रा. पं. अध्यक्ष भालचंद्र पाटील, उपाध्यक्षा रुक्मिणी सिंगारी व सदस्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. ग्राम पंचायत सदस्या बबिता पाटील व लक्ष्मी पाटील यांनी सरस्वती व लक्ष्मी देवीच्या फोटोचे पूजन केले. ग्रा. पं. सदस्य सुनील चौगुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन केले. तर सोसायटीचे संस्थापक माजी आमदार कै. जी. एल. अष्टेकर यांच्या फोटोचे पूजन ग्रा. पं. सदस्य किरण पाटील, संजय पाटील व शाम मुतगेकर यांनी केले. त्यानंतर सर्व नुतन सदस्यांचे मान्यवरांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तसेच पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी मुतगे गावची सुपुत्री स्वाती परशराम अंची हिने सीए परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल आणि सुरेश चौगुले यांची बेळगाव येथील राजर्षी शाहू छत्रपती सोसायटीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात
आला.
यावेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलताना एन. डी. बंडाचे म्हणाले की, सर्व नवनिर्वाचित सदस्यांनी गावचा कारभार चालविताना त्यांनी अनुभवी लोकांचे मार्गदर्शन घेऊन गावची प्रगती साधावी, सत्काराला उत्तर देताना ग्राम पंचायत अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले की, गावच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून मुतगे एक आदर्श गाव बनविण्यासाठी सर्वांचे प्रयत्न राहणार आहेत. कार्यक्रमास संस्थेचे सर्व संचालक, सल्लागार व कर्मचारी उपस्थित होते. एन. एस. बमणवाडी यांनी आभार मानले.