वेतनाबरोबरच भत्ते, थकबाकी, निवृत्तीनिधीही थकला कर्जाचे-विम्याचे हप्ते चुकण्याबरोबरच अनेक समस्या
प्रतिनिधी / वास्को
चार महिन्यानंतर मुरगाव पालिकेच्या कामगारांनी वेतनाच्या मागणीसाठी काल सोमवारी पुन्हा काम बंद करुन संप केला आहे. पालिकेच्या कामगारांना मागच्या महिन्याचे वेतन अद्याप मिळालेले नाही. या संपामुळे मुरगाव पालिका क्षेत्रात सोमवारी सफाईची कामे होऊ शकलेली नाहीत.
पालिका मंडळाचा कार्यकाळ संपण्यापूर्वी कामगारांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता. तेव्हाही पालिका कामगारांनी काम बंद ठेवून पालिका प्रशासनावर दबाव आणला होता. मात्र, गेले चार महिने पालिका प्रशासनाने या कामगारांचे वेतन कसेबसे फेडले होते. त्यामुळे कामगारांवर काम बंद ठेवायची पाळी आली नव्हती. या महिन्यात पालिका कामगारांच्या वेतनाची जमवाजमव करण्यास पालिका प्रशासनाला यश आले नाही. त्यामुळे वेतनाचा प्रश्न रेंगाळत राहिलेला आहे. जानेवारीचे वेतन या कामगारांना अद्याप मिळालेले नाही. त्यामुळे काही दिवसांपूर्वी पालिका कामगारांच्या संघटनेने पालिका मुख्याधिकाऱयांना वेतन न मिळाल्यास सोमवारी काम बंद ठेवण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार काल सोमवारी या कामगारांनी कामावर दाखल होऊनही का बंद ठेवले.
सकाळी प्रथम कामगारांनी पालिकेच्या गॅरेजजवळ निदर्शने केली. त्यानंतर कामगारांचा जमाव पालिका इमारतीसमोर आला. या ठिकाणी मुरगाव पालिकेचे अतिरीक्त मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांच्याशी कामगारवर्गाची चर्चा झाली. कामगारांनी वेतन मिळाल्याशिवाय कामावर हजर न होण्याची भूमिका कायम ठेवली आहे. कामगारांनी दिलेल्या माहितीनुसार मागच्या अडिच वर्षांपासून वेतनाचा प्रश्न उपस्थित होत आहे. वेतनाबरोबरच कामगारांचे भत्ते, सातव्या वेतन आयोगाची थकबाकी तसेच निवृत्त कामगारांचाही निधी थकलेला आहे. वेतनाच्या अनियमितपणामुळे कर्जाचे हप्ते, विमा हप्ते चुकण्याबरोबरच इतर अनेक समस्या कामगारांना भेडसावत असून कामगारांच्या या आर्थिक समस्या त्वरित सोडवाव्यात अशी मागणी कामगारांनी केली आहे.
दरम्यान, सोमवारी संपाच्या पहिल्या दिवशी शहरातील सफाई कामे बंद राहिली व पालिकेतील प्रशासकीय कामेही बंदच होती. शहरात कचऱयांचे ढिगारे वाढू लागलेले आहेत. कार्यायलीन कामेही बंद राहिलेली असल्याने आपल्या कामांसाठी पालिका कार्यालयात येणाऱया लोकांनाही अडचणीला सामोरे जावे लागत आहे. कामगारांच्या संपामुळे प्रशासनावर दबाव आलेला आहे. पालिका मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी पालिका कामगारांच्या वेतनाचा प्रश्न सुटावा म्हणून सरकार दरबारी प्रयत्न प्रयत्न जारी असल्याचे स्पष्ट केले आहे. शहरातील व्यापारी वर्गानेही थकलेला कर व भाडेपट्टी पालिकेकडे जमा करून सहकार्य करावे असेही आवाहन त्यांनी केले आहे.