प्रतिनिधी / कारवार
समुदात बुडणाऱया एकाच कुटुंबातील तिघांना स्थानिकांनी वाचविल्याची घटना रविवारी जिल्हय़ातील मुर्डेश्वर येथे घडली. संजना (वय 15), संजय (वय 18) आणि कमलम्मा (वय 40 रा. तिघेही कत्रीगुप्पी, बेंगळूर) अशी नावे आहेत. या प्रकरणाबद्दल अधिक माहिती अशी, चौथा शनिवार व रविवार असल्याने कंत्रीगुप्पी, बेंगळूर येथील प्रवाशी मुर्डेश्वर येथे दाखल झाले होते. समुद्रस्नानाचा आनंद लुटण्यासाठी अरबी समुद्रात प्रवाशी उतरले असता एकाच कुटुंबातील संजना, संजय व कमलम्मा समुद्रात गटांगळय़ा खाऊ लागले. ही घटना लक्षात येताच ओशियन ऍडव्हेंचर्सचे चंद्रशेखर देवाडीग व संजीव हरिकंत्र यांनी पाण्याबाहेर काढले. मुर्डेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.