प्रतिनिधी/ रत्नागिरी
मुलांसह पत्नी माहेरी गेल्यामुळे पतीने राहत्या घरी दोरीने गळफास घेतल्याची घटना शहरातील उद्यमनगर येथे घडल़ी या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन रामचंद्र ठीक (41, लेप्रसी हॉस्पीटलमागे उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी गळफासाने आपले जीवन सुंष्टात आणले. ही घटना 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान घडली. या बद्दल संजय रामचंद्र ठीक (43, लेप्रसी हॉस्पीटलमागे उद्यमनगर, रत्नागिरी) यांनी शहर पोलीस स्थानकात माहिती दिल़ी मृत सचिन ठीक यांची पत्नी पायल आपल्या मुलांसह माहेरी गेली होत़ी यामुळे अस्वस्थ असलेल्या सचिन यांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले आहे. त्यांनी राहत्या घरी सिमेंटच्या पिलरला दोरीने गळफास घेतल़ा या प्रकरणी अधिक तपास शहर पोलीस करत आहेत़