एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांची माहिती – लहान मुलांनाही मिळणार कोरोना प्रतिबंधक डोस
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेने वेग घेतलेला असतानाच आता कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. त्यातच आता येत्या दोन-चार महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त होत आहे. ही लाट लहान मुलांसाठी घातक असल्याची चर्चा सुरू असतानाच लहानमुलांचे लसीकरण सप्टेंबर महिन्यापासून सुरु होण्याची शक्मयता वर्तवली जात आहे.
लहान मुलांसाठीच्या लसीची चाचणी प्रगतीपथावर असून आतापर्यंतच्या तिच्या चाचण्या यशस्वी ठरल्या आहेत. सर्व चाचण्या पूर्ण झाल्यानंतर सप्टेंबरपर्यंत लहान मुलांचे लसीकरण सुरू होऊ शकते, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी स्पष्ट केले. रणदीप गुलेरिया हे कोविड टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य आणि एक सुप्रसिद्ध पल्मोनोलॉजिस्ट देखील आहेत. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मुलांच्या वापरासाठी सप्टेंबरपर्यंत मान्यता देण्यात येईल. कोव्हॅक्सिनच्या दुसऱया आणि तिसऱया टप्प्यातील चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. कोव्हॅक्सिनबरोबरच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ती देखील मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते, असे डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे.
दिल्ली आणि पटना येथील एम्समध्ये सध्या 2 ते 12 वर्ष वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनची चाचणी सुरु आहे. डीसीजीआयने 12 मे रोजी मुलांवर फेज दोन आणि तीन चाचणी घेण्यास भारत बायोटेकला मान्यता दिली होती. दिल्ली एम्सने पूर्वीपासूनच मुलांची स्क्रीनिंग सुरू केली आहे. 7 जूनपासून मुलांवर लसीची चाचणी सुरू झाली आहे.
कोरोनाच्या दुसऱया लाटेचे संकट दूर होत असतानाच आता तिसऱया लाटेच्या धोक्मयाबाबतही शक्मयता वर्तवली जात आहेत. तज्ञांच्या मते, कोरोनाची तिसरी लाट लवकरच भारतात दिसू शकते. यासह, काही तज्ञ आणि अभ्यासकांच्या मते, तिसऱया लाटेत मुलांना सर्वाधिक धोका होण्याची शक्मयता आहे. या दरम्यान मुलांच्या लसीबाबत मोठी माहिती समोर आली आहे.
मुलांना धोका नसला तरी काळजी घ्यायलाच हवी!
तिसऱया लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याच्या चर्चांवर विश्वास ठेवण्याचे कोणतेही कारण नाही. अलीकडेच डब्ल्यूएचओ आणि एम्सने संयुक्तपणे केलेल्या सेरो सर्वेक्षणातील निष्कर्षांनुसार, प्रौढांपेक्षा मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्मयता नाही. दहा हजार प्रस्तावित लोकसंख्या असलेल्या पाच निवडक राज्यांमध्ये यासंबंधी निरीक्षण करण्यात आले होते, असे स्पष्टीकरण देत डॉ. गुलेरिया यांनी मुलांच्या शाळा सुरू करण्यावर विचार करण्यासदेखील सांगितले आहे. मात्र, शैक्षणिक संस्था कोरोनाचे सुपर स्प्रेडर होणार नाहीत, याचीही काळजी घेतली पाहिजे, असे ते पुढे म्हणाले.