फायजर’ची निर्मिती – 12 ते 15 वयोगटातील मुलांना मिळेल लस
लंडन / वृत्तसंस्था
ब्रिटनमध्ये 12-15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी फायजर-बायोटेकच्या कोरोनाप्रतिबंधक लसीला मंजुरी देण्यात आली आहे. ब्रिटनच्या नियामक मंडळाने आपत्कालीन परिस्थितीत त्याचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. यापूर्वी कॅनडा आणि अमेरिकन नियामकांनीही असाच निर्णय घेतला होता. कोरोनाच्या तिसऱया लाटेचा फटका मुलांना बसण्याची शक्मयता वर्तवली जात असतानाच आता ‘फायजर’ कंपनीची लस उपलब्ध होणार असल्याने दिलासा व्यक्त होत आहे. नजिकच्या काळात ही लस भारतात उपलब्ध करण्यासाठी केंद सरकारने संबंधित कंपनी आणि सरकारशी बोलणी सुरू केली आहेत.
फायझर-बायोटेकची लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. युरोपियन औषध एजन्सीने (ईएमए) फायझरची लस 12 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना दिली जाण्याची शिफारस केली होती. फायजर कंपनीच्या माहितीनुसार, ‘एमएचआरए’ने (मेडिसीन्स आणि हेल्थकेअर उत्पादने नियामक एजन्सी) केलेल्या मूल्यांकनात लसीचे फायदे त्याच्याशी संबंधित जोखमींपेक्षा जास्त आहेत.
भारतालाही लस उपलब्ध होणार
भारतात सध्या 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर कोव्हॅक्सिनच्या चाचण्या सुरू आहेत. दरम्यान, लवकरच मुलांसाठी आणखी एक लस मिळण्याची आशा वाढली आहे. फायजरची लसदेखील मुलांना दिली जाऊ शकते, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. अमेरिका, ब्रिटन, युरोप, डब्ल्यूएचओ यांनी तातडीच्या वापरासाठी मंजूर केलेल्या या लसींना केंद्राने यापूर्वीच मान्यता दिली आहे.
‘कोव्हॅक्सिन’च्या चाचण्यांना न्यायालयात आव्हान
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीची चाचणी 525 आरोग्य स्वयंसेवकांवर केली जात आहे. मात्र, ही चाचणी थांबविण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. मुलांवर चाचण्या म्हणजे नरसंहार करण्याचा प्रकार असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे.