मूत्रपिंडाच्या शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीची गरज
बेळगाव : आपल्या मुलाच्या मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी आईच्या जीवाची घालमेल होत आहे. काबाडकष्ट केल्याशिवाय उदरनिर्वाह चालत नाही. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असून मूत्रपिंडाच्या आजाराशी झुंजणाऱया तरुण मुलावर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याने आईने भावूक होत मदतीचे आवाहन केले आहे.
तानाजी गल्ली, होनगा येथील 32 वर्षीय गजानन हुंदरे या तरुणाचे मूत्रपिंड निकामी झाले आहे. यामुळे त्याच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. मात्र आर्थिक समस्या असल्याने हुदंरे कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. भावकाण्णा यांची आई आपले मूत्रपिंड आपल्या मुलास देण्यास तयार आहे. परंतु मूत्रपिंड देऊनही त्यांना उपचार व शस्त्रक्रियेसाठी 10 लाख रुपयांची गरज आहे.
तसेच सध्या गजाननवर डायलेसिसचे उपचार चालू आहेत. परिणामी आठवडय़ाला 7 हजार रुपये मोजावे लागत आहेत. अशा बिकट परिस्थितीत 10 लाखाचा डोंगर हुंदरे कुटुंबीयांना उभा करावयाचा आहे. त्यामुळे हुंदरे कुटुंबीयांनी समाजातील दानशूर व्यक्तिंना मदतीचे आवाहन केले आहे.
यासाठी पुढे दिलेल्या बँक तपशीलावर निधी जमा केल्यास मोलाची मदत ठरणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा काकती आयएफएससी कोड-एसबीआयएन 0015454, एसी नं. 33460938731, फोन पे – 9741262297 तसेच अधिक माहितीसाठी 9741262297 किंवा 8660305925 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.