मालवण:
मालवण-कुडाळ विधानसभा मतदारसंघातील 18 वर्षांखालील मुलींच्या लेदरबॉल क्रिकेट संघाची मध्यप्रदेश येथे पुढील सामना खेळण्यासाठी निवड झाली आहे. संघातील खेळाडूंसमोरील आर्थिक अडचणींमुळे त्यांना मध्यप्रदेशमध्ये जाणे शक्य होत नव्हते. माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर व नगरसेवक दीपक पाटकर यांनी भाजप नेते नीलेश राणे यांचे याकडे लक्ष वेधले. त्यानंतर राणेंनी महिला संघाच्या प्रवास खर्चाची जबाबदारी घेत त्यांना प्रोत्साहन दिले. 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता शहर भाजप कार्यालयात महिला क्रिकेट संघाला आर्थिक मदत सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती मालवण शहर प्रभारी विजय केनवडेकर यांनी दिली. आचरेकर, पाटकर, गटनेते गणेश कुशे, बाबा परब उपस्थित राहणार आहेत.