गोवा प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाची मागणी
प्रतिनिधी /वास्को
गोवा प्रदेश काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष नजीर खान यांनी येत्या विधानसभा निवडणुकीत गोव्यातील मुस्लीम समाजासाठी दोन मतदारसंघात उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी पक्षाच्या नेत्यांकडे केली आहे. पक्षाच्या नेते या मागणीची दखल घेतील अशी अपेक्षा नझीर खान यांनी व्यक्त केली आहे.
यासंबंधी माध्यमांशी बोलताना नझीर खान यांनी सांगितले की, येत्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दिल्लीत नुकतीच काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांसमवेत अल्पसंख्यांकांशी निगडीत विषयावर बैठक झाली आहे. आपण या बैठकीला हजर होतो. या बैठकीत उमेदवारांसंबंधीत कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही. मात्र, येत्या निवडणुकीत गोव्यात काँग्रेसतर्फे दोन जागा अल्पसंख्यांक मुस्लीम समाजाला देण्यात याव्यात अशी मागणी आपण यापूर्वीच पक्षाच्या नेत्यांकडे केलेली आहे. नावेली मतदारसंघात मुस्लीम समाजाचा ईच्छुक उमेदवार कार्यरत आहे. काँग्रेस पक्ष दोन जागा देणे शक्य नसल्यास किमान एक जागा देऊ शकतो. मात्र, दोन जागांसाठी आपण मागणी केलेली आहे. या विषयावर अंतीम निर्णय गोवा प्रदेश काँग्रेस समिती पक्ष श्रेष्ठींशी चर्चा करूनच घेतील असे खान म्हणाले.